“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा”चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन

"आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रा"चे मोदी यांच्या हस्ते उदघाटन
अहमदनगर (प्रतिनिधी) — अहमदनगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या आयटीआय, एमआयडीसी येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” चे उद्घाटन झाले. या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदर्शन प्रणालीद्वारे करण्यात आले.
या सोहळ्यात राज्यपाल श्री सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते.
तसेच डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सुरु झालेल्या या केंद्राचे उद्घाटन माजी विद्यार्थी उद्योजक श्री लांडे भाऊसाहेब सूर्यभान व शासकीय अधिकारी श्री अश्विन कुमार बिडगर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी आयटीआय मधील सर्व स्टाफ उपस्थित होता.
केंद्रामध्ये “प्लट इन्स्टॉलेशन टेक्निशन” आणि “इलेक्ट्रिकल मल्टी स्किल टेक्निशन” हे दोन नवीन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. प्रदूषणविरहित सौर ऊर्जा ही भविष्याची मोठी गरज असल्याचे सांगून त्याचे शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, असे प्राचार्य श्री अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल महसूल मंत्री आणि संस्थेचे चेअरमन श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेक्टर डॉ. पीएम गायकवाड, डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे, डेप्युटी डायरेक्टर सुनील कलापुरे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.