Radhakrushna vikhe patil : कृषी विज्ञान केंद्रे पगार खाण्यासाठीच, संशोधन नाहीच : ना. विखे पाटील

कृषी विज्ञान केंद्रे पगार खाण्यासाठीच, संशोधन नाहीच : ना. विखे पाटील
Radhakrushn Vikhe Patil – राज्यासह देशातील कृषी विज्ञान केंद्रे (agriculture science centers) ही फक्त भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पगार खाण्यासाठीच बसली आहेत, येथे संशोधनच होत नसल्याचा आरोप करत राज्याचे माहुलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrushna vikhe patil) यांनी कृषी विज्ञान केंद्रांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. अकोला कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीसाठी मंत्री विखे पाटील आले होते.त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.
दरम्यान राज्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या कारभारावर अनेकांनी टीका केली आहे. त्यातच आता विखे पाटील यांनी देखील कृषी केंद्रांच्या कारभारावर संशय व्यक्त करत संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याची टीका करून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. सध्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे कृषिमंत्री आहेत. तसेच कृषीसाठी कृषी विज्ञान केंद्रांकडून (शेती आदी) फायदेशीर काही संशोधन होत नसल्याची टीका सातत्याने होते आहे.
उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल
पक्षाने अद्यापही कुठलेच उमेदवारी जाहीर केले नाही. माजी खा. सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे अद्याप सुजय आणि मला त्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे विखे यांनी म्हटले आहे. सुजय विखेंच्या उमेदवारीवरून पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार पुढे पाहू. शेवटी सुजय हा जिल्ह्याचा खासदार राहिला आहे. पक्षाने त्यांना आदेश दिल्यास तो पाळावा लागेल.
आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक
कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल अशी मुख्यमंत्र्यांची सुरूवातीपासूनच भूमिका आहे. म्हणून विधानसभेच्या पूर्वी विशेष अधिवेशन बोलावले जाईल. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकार पूर्ण बांधिल आहे. पण आरक्षण संदर्भात अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक आणि सकारात्मक आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.