मराठा आरक्षण : समाजाचा भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोको; चंद्रकांत लबडे यांच्यासह तिघांचे उपोषण

मराठा आरक्षण : समाजाचा भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोको; चंद्रकांत लबडे यांच्यासह तिघांचे उपोषण
शेवगाव तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्यावतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भातकुडगाव फाटा येथे 2 दिवसांपासून मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे, राजेंद्र आढाव, अशोक देवढे, रामजी शिदोरे या मराठा सेवकांचे आमरण उपोषण सुरू आहे.यावेळी समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान सरकारने ६ दिवस होऊनही मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याने आज भातकुडगाव फाटा येथे मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगाडे, पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, पोलीस बापासाहेब धाकतोडे हे प्रशासनाच्यावतीने उपस्थित होते. आंदोलकांनी त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.