जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या जिल्हा बंदची हाक !

जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या जिल्हा बंदची हाक !
Ahmednagar – सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. ६ दिवसांपासून त्यांचे उपोषण चालू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण देखील सुरू आहे. विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर उद्या विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे.