महाविकास आघाडीला हादरे, रोहित पवारांना मोठा धक्का

महाविकास आघाडीला हादरे, रोहित पवारांना मोठा धक्का
Ahmednagar – अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीला हादरे बसले असून विधासभा निवडणुकीपूर्वी राम शिंदेंचा आ. रोहित पवारांना जोरदार धक्का दिला आहे. कर्जत – जामखेड तालुक्यातील महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच रोहित पवार याना मोठा फटका बसू शकतो.
जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह उबाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे व मविआचे पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश मुख्यालयात हा प्रवेश पार पडणार आहे.