धनगर आरक्षणाचा निर्णय झाला तर मुंबईच पाणी बंद करू, रेल्वे रूळ उखडून टाकू : आमदार किरण लहामटे

धनगर आरक्षणाचा निर्णय झाला तर मुंबईच पाणी बंद करू, रेल्वे रूळ उखडून टाकू : आमदार किरण लहामटे
MLA Kiran Lahamate – राज्य सरकारने जर धनगरांसाठीचा जीआर काढला, जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील अमदार आणि खासदार एकत्र येऊन निर्णय घेऊ. आत्तापर्यंत आदिवासी समाजाने एवढा त्याग केला आहे, जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते थांबवू, रेल्वेचे रूळ उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षणाचाही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
दरम्यान आमदार लहामटे म्हणाले कि, मुळात धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भातील निर्णय हा केंद्राचा आहे. धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा आम्हाला वेगळं आरक्षण द्या अशी मागणी केली आहे त्यामुळे सरकारने असा कोणताही निर्णय घेऊ नये. त्यांनी तास निर्णय घेतला तर आम्ही दाखवून देऊ.
तसेच ‘ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुती मधून कोणीच बाहेर काढू शकत नाही’असा दावा देखील लहंते यांनी केला आहे. ‘महायुती कडून विकासकामांचा पाढा लावण्यात आला आहे.आणि अमचा पक्ष हा शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांचा आहे’ असे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान धनगर आरक्षणासाठी समितीची आज बैठक होणार आहे. तत्पूर्वी सरकारमधीलच आमदार किरण लहामटे यांनी सरकारला इशारा दिला आहे.