chatrapati sambhaji raje : जरंगे यांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार; त्यांनी सत्तेत यावे : छत्रपती संभाजी राजे

जरंगे यांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार; त्यांनी सत्तेत यावे : छत्रपती संभाजी राजे
जालना – मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये आले. त्यांनी जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून मनोज जरांगेंना काही झाले तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे (chatrapati sambhaji raje) यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतिहासातील शरमेची बाब आहे. त्यांची तब्येत खालावत आहे, मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यांच्याशी बोललो आहे. मात्र त्यांची सर्वानी काळजी घ्यावी. आरक्षणाच्या लढ्यात आपण सदैव तुमच्या सोबत आहे.
तसेच छत्रपती संभाजी राजे म्हणाले कि, सरकार निवांत मुंबईत एअर कंडिन्शन्स ऑफिसात बसले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना… घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका. ही काय पद्धत आहे. इथले मेडिकल रिपोर्ट जातात तिकडे. मेडिकल रिपोर्ट वाईट आहेत. काही होऊ शकतं. त्याला तुम्ही (सरकार) जबाबदार असणार आहात.
आरक्षणासाठी सत्ता महत्वाची : छत्रपती संभाजी राजे
उपोषण व आंदोलनाद्वारे मराठा समाजाच्या तीव्र भावना स्पष्टपणे समोर येत असूनही, सरकार या प्रश्नाकडे पुरेसे गांभीर्याने पाहत नाही. सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे. अशा परिस्थितीत, जरांगे पाटलांनी आपले आंदोलन सुरू ठेवावे, परंतु समाज आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना सक्रिय राजकारणात येणे आवश्यक आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता हातात असणे अत्यावश्यक आहे.
असंवैधानिक आंदोलनाला भेटणे योग्य नाही
छत्रपती संभाजीराजे यांना तुम्ही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना भेटणार का, असा प्रश्न पत्रकारपरिषदेत विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले की, मी स्पष्ट सांगितलय की, मुद्दा रास्त असेल, संवैधानिक पद्धतीने त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या असत्या तर मी तिकडे गेलो असतो. पण तुमही बोलताय, इतर समाजातील लोकांनी आंदोलन करायचे नाही, त्यांना अधिकारच नाही. त्यासाठी दुसऱ्या बाजूने आंदोलन सुरु करायचे, हा ईर्ष्या निर्माण करण्याचा प्रकार आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
2 thoughts on “chatrapati sambhaji raje : जरंगे यांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार; त्यांनी सत्तेत यावे : छत्रपती संभाजी राजे”