बार्टी-सारथीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार

बार्टी-सारथीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार
मुंबई – बार्टी संस्थेतल्या नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या ७२४ आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्याला काल दि. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यांचा फायदा होणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.
दरम्यान मंत्रिमंडळाच्या या निर्णयानुसार बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्थेकडे १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत कायम नोंदणी असलेल्या ७२४ विद्यार्थ्यांना आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळणार आहे. नियोजन विभागानं हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला. या निर्णयाचा राज्यातील तरुणांना मोठा लाभ होणार आहे.
1 thought on “बार्टी-सारथीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार”