Anganwadi Sevika : राज्यातील अंणवाडी सेविका ५ हजार; मदतनिसांना ३ हजारांची पगारवाढ !

Anganwadi Sevika : राज्यातील अंणवाडी सेविका ५ हजार; मदतनिसांना ३ हजारांची पगारवाढ !
मुंबई – राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी (anganwadi sevika) आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आज दि. ३० ऑक्टोबर रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
महिला आणि बाळ विकासमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात सुमारे 50 टक्के इतकी वाढ आम्ही केली आहे. तसेच ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3 हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना 10 हजार रुपये मिळत होते. त्यात आता 5 हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3 हजार वाढवले होते. मात्र, आता 5 हजार वाढवण्यात आले आहेत, असेही तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे. याचा अंमलबजावणी देखील लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव असून सरकारचे या निर्णयामुळे कौतुक केले जात आहे.