21/02/2026

ग्रामरोजगारसेवक, कोतवाल यांच्या मानधनात वाढ; प्रोत्साहन अनुदान-अनुकंपा धोरण लागू

2
gramrojgarsevak

ग्रामरोजगारसेवक, कोतवाल यांच्या मानधनात वाढ; प्रोत्साहन अनुदान-अनुकंपा धोरण लागू

राज्यातील ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्यांत येणार आहे. तसेच कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ आणि अनुकंपा धोरणाही लागू करण्याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ग्रामपातळीवर ज्या ग्रामरोजगार सेवकांनी 2 हजार पेक्षा जास्त दिवस काम पूर्ण केले आहेत. त्यांना मजुरी खर्चाच्या एक टक्के प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. दोन हजार दिवसांपर्यंत काम केलेल्या ग्रामरोजगार सेवकांना दर महिना एक हजार रूपये व दोन हजार एक पेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा दोन हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येईल. असा निर्णय ग्रामरोजगार सेवकांबाबत घेण्यात आला आहे.

तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 12 हजार 793 कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास, किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजूरी देण्यात आली आहे.

About The Author

2 thoughts on “ग्रामरोजगारसेवक, कोतवाल यांच्या मानधनात वाढ; प्रोत्साहन अनुदान-अनुकंपा धोरण लागू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed