Amla Benefits : आरोग्यदायी आवळा, आहारात करा आवळ्याचा समावेश, पचन, वजन कमी करण्यास उपयुक्त….

0
amla

Amla Benefits : आरोग्यदायी आवळा, आहारात करा आवळ्याचा समावेश, पचन, वजन कमी करण्यास उपयुक्त….

आवळा हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा असा औषधी वनस्पती मानला जातो. त्याचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत. आवळ्यात (amla) विटामिन सी, लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे आवळ्याचे आपल्या आहारात अनन्य साधारण महत्व आहे. आवळा (amla) बहुतेकांना आवडतो. चवीसाठी, आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवळा उपयुक्त आहे. आवळा आपल्या तब्येतीसाठी खूपच उपयुक्त आहे. त्याआवळ्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे…

Read This : ग्रामरोजगारसेवक, कोतवाल यांच्या मानधनात वाढ; प्रोत्साहन अनुदान-अनुकंपा धोरण लागू

रोगप्रतिकारक शक्ती : आवळ्यातील विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे शरीरातील संक्रमण आणि आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : आवळ्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आवळ्यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते.

पचनासाठी उपयुक्त : आवळा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो आणि अपचन, अ‍ॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देतो.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त : आवळा नियमित खाल्ल्यास त्वचा निरोगी व चमकदार होते, कारण त्यात अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात. त्यामुळे आवळा मोठ्या आवडीने झाला जातो.

केसांसाठी उपयुक्त : आवळा केसांच्या मुळांना बळकट करून केसांची वाढ वाढवतो आणि केस गळणे कमी करतो. आवळ्याचे तेल देखील मिळते. त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर देखील केला जातो.

मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त : आवळा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे डायबिटीज असलेल्या लोकांना याचा फायदा होतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते: आवळा कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो.

रक्त शुद्ध करण्यास मदत होते : आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.

दृष्टी सुधारण्यासाठी उपयुक्त – आवळ्यामध्ये असलेले जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ डोळ्यांसाठी चांगलं आहे. आवळा रोज खाल्ल्यानं दृष्टी सुधारण्यास मदत होते.

आवळा अनेक प्रकारे वापर करता येतो, जसे की रस, लोणचं, चूर्ण किंवा कच्चा खाण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. अनेक परिवार याचा वापर करतात. अधिक माहितीसाठी आपल्या तज्ज्ञ किंवा डॉटरांचा सल्ला घ्यावा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.