Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड
marathi sahitya sammelan – दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (marathi sahitya sammelan) यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.
लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. तारा भवाळकरांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्या सहाव्या महिला अध्यक्ष आहेत. ९८ वर्षात ६ महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या.
साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांचा लोककला, नाटके, संस्कृती आदींचा गाढ अभ्यास आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.