शिवस्मारक शोधमोहीम : संभाजी महाराजांचा सरकारवर हल्ला, स्मारक सापडलेच नाही..

शिवस्मारक शोधमोहीम : संभाजी महाराजांचा सरकारवर हल्ला, स्मारक सापडलेच नाही..
मुंबई – मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू असे म्हणत २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. मात्र आता ८ वर्ष उलटले तरी स्मारक उभे राहू शकले नाही. शोधूनही स्मारक दिसले नाही अशी खंत स्वराज्य पक्षाचे प्रमुख तथा छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केली.
संभाजी महाराज म्हणाले कि, अनेक सरकारे आली आणि गेली मात्र शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभे राहू शकले नाही. महाराजांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर होतो. मात्र आता असे होऊ दिले जाणार नाही. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हे सरकार जबाबदार असल्याची टीका देखील त्यांनी केली.
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक शोधण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह अरबी समुद्र गाठला. शोधले मात्र स्मारक सापडले नाही. त्यांनी या स्मारकासाठी रेकॉर्डवर खर्च झाला असल्याचा गंभर आरोप सरकारवर केला. यावेळी अनेक कार्यकत्र्यांना पोलिसांनी अडवले आणि पोलीस गाडीत बसवले होते मात्र, संभाजी महाराजांनी आपण कायदा हातात घेण्यासाठी आलेलो नाही. स्मारक शोधण्यासाठी आलो असल्याचे म्हटले. त्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.