Bigg Boss Marathi : झपुक.. झुपक.. सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विजेता..

झपुक.. झुपक.. सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विजेता.. (फोटो सोर्स : रितेश देशमुख FB)
Suraj Chavan Winner Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठी सीझन ५ च्या (Bigg Boss Marathi) विनर ट्रॉफीवर सूरजने (Suraj Chavan) आपले नाव कोरले आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचे वागने, बोलने या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सुरज याने आपले नाव कोरले आहे. तर गायक आणि स्पर्धक अभिजित सावंत दुसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजेच तो उपविजेता ठरला.
दरम्यान रिल स्टार सुरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासूनच सुरु होती. फक्त नाव घोषित होण्याची सगळ्यांना वाट पाहत होते. आणि तो विजयी झाला. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झाल. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरला.

हे होते टॉप ६ स्पर्धक…
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सूरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. अखेर प्रेक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार सूरज बिग बॉस मराठीचा विजेता ठरला.
सुरज चव्हाण बिग बॉस मराठी सिझन ५ चा विजेता ठरल्यानंतर राज्यासह देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, खा, निलेश लंके. अमोल कोल्हे, अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह अनेकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
ट्रॉफी जिंकल्यानंतर सुरज चव्हाण याने आपली प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला कि, जिंकलेले पैशातून घराचे काम करून त्यावर आपण बिग बॉस चे नाव आपण कॉर्नर आहोत. तसेच सर्वांचे त्याने आभार देखील मानले.
1 thought on “Bigg Boss Marathi : झपुक.. झुपक.. सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विजेता..”