Satyajeet Tambe : शाळा – शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सत्यजित तांबे यांचे मंत्रालयात आंदोलन !

Satyajeet Tambe : शाळा - शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सत्यजित तांबे यांचे मंत्रालयात आंदोलन !
satyajeet tambe – राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शाळा (school), वर्ग व तुकड्यांना प्रतिवर्षी विना अट टप्पा वाढ लागू करून त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना समान टप्पावाढ द्यावी व पुणे स्तरावरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, या आणि इतर मागण्यांसाठी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयातील गांधी पुतळ्याजवळ उपोषण करण्यात आले.
read this : Bigg Boss Marathi : झपुक.. झुपक.. सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठीचा विजेता..
या शिक्षकांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून देशाचे भविष्य घडवणाऱ्या गुरूजनांबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा, ही राज्य सरकारला नम्र विनंती आहे. तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीनियुक्त व नंतर झालेल्या 26 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करवी, अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना प्रचलित प्रमाणे पुढील टप्पा अनुदान देणे आणि त्रुटीमुळे समान टप्पा देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये किशोर दराडे, किरण सरनाईक आदी सहभागी झाले होते.