पुढील ६ दिवस राज्यात मुसळधार पाऊस


पंजाबराव डख यांचा अंदाज
राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या गारपिटीचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळीचं संकट घोंगावत आहे.
12 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, सोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.

डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाचा स्वरुप सर्वदूर असं जरी नसलं तरी मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून देखील हायअलर्टजारी करण्यात आला आहे आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.