80 कोटींची रामायणसाठी ऑफर!
“रावण” साकारण्यास अभिनेता यशचा नकार
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यास अभिनेता यशने नकार दिला आहे.
नितेश तिवारीच्या चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण आता ही भूमिका यश नाही तर अन्य कलाकार करणार आहे.

यश ला या चित्रपटासाठी 80 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, यशनेही रावणाच्या भूमिकेसह 80 कोटींवर पाणी सोडले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यशने रावणाची भूमिका सोडली असली तरी तो चित्रपटाशी संबंधित असणार आहे. यश हा आता निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून अथवा यशकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही.
‘रामायण’मध्ये रणबीर कपूर हा श्रीरामाची आणि अभिनेत्री सई पल्लवी ही माता सीतेची भूमिका साकारत आहेत. त्याचबरोबर रामायणातील शूर्पणखाच्या भूमिकेसाठी कुब्रा सैत आणि हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलच्या नावाची चर्चा सुरू आहे. कास्टिंगबाबत अजून कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही.