महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर

Chatrapati Udayanraje Bhosale
लढत चुरशीची होणार!
साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि छत्रपती उदयनराजे भोसले या दोन्ही उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुक हि चुरशीची होईल असेच काहीसे चित्र आहे. मात्र याना उमेदवारी दिल्याने भाजपचे काही पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात आहे.

आज दि. १६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठीची बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील सातारा लोकसभेच्या जागेवरून तिढा काही सुटत नव्हता. मात्र आज तो तिढा अखेर सुटल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र येथील जागा हि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याची होती तरी देखील येथे भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने अजित पवार हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे, कि पवार हे उदयनराजे याना पाठिंबा देतात ये अद्याप निश्चित झालेले नाही.
काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरु केला होता. मात्र त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, अखेर आज ती अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
३० वर्षांपासून लोकांची सेवा
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव हि संकल्पना राबवली तीच पुढे घेऊन जात गेल्या ३० वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. लोकांचे आशीर्वाद मिळालेत, सर्वांची साथ मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत राबवले जात आहेत असे उदयनराजे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे लोकसभेचे उमेदवार असणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत पाहायला मिळणार आहे.