सुजय विखेंविरोधात भाजपमध्ये संताप

सुजय विखेंविरोधात भाजपमध्ये संताप
रासने यांच्यासह १०० कार्र्यकर्त्यांचा राजीनामा
भाजपतील दुफळीने दोन्ही “विखें”चे टेन्शन वाढणार?
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. अशातच शेवगांव येथील भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश सदस्य सुनील रासने यांच्यासह भाजपचे सुमारे 100 कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या नाराजीमुळे उमेदवारी बदलाच्या चर्चा मतदारसंघात सुरु झाल्या आहेत. भाजपातील या दुफळीचा मात्र माजी आमदार निलेश लंके याना फायदा होताना दिसत आहे.

दरम्यान मतदार संघातील या नाराजी नाट्याला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील कशाप्रकारे हाताळतात हे पाहावे लागेल.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा अहिल्यानगर ३७ या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार देखील सुरु आहे. मात्र, अशातच डॉ. विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्याने आणि कोणालाही विश्वासात घेतले जात नसल्याने मतदार संघातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे भाजपचे जवळपास १०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामूहिकरित्या भाजपचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक ठिकाणी देखील याचप्रकारे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मनात खदखद आहे.
आ. राम शिंदे आणि माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सुजय विखे याना पुन्हा एकदा संधी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आ. राम शिंदे यांच्या नावाचा आग्रह स्रेष्ठीसमोर धरला होता.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्यावर नाराजी दाखवून भाजपचे ओबीसी प्रदेश सदस्य सुनील रासने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात येऊन त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. विद्यमान खासदार यांचा संपर्क आणि कमाची व्याप्ती कमी झाली आहे. साखर वाटप कार्यक्रम असे इव्हेंट त्यांनी केले. मात्र ते सपशेल फेल ठरले आहेत. पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे फोन घेत नाहीत, मी म्हणजे पक्ष, मी म्हणजे मतदारसंघातील जनता, असे मानून मतदारांना गृहीत धरले जात आहे, भाजप ४०० जागा जिंकेलही मात्र (नगर) अहिल्यानगरची जागा निवडून येणार नाही याचे प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकारी याना पच्छाताप वाटत असल्याचा आरोप करून मी, ४० वर्ष झाले पक्षाचा कार्यकर्ता आहे.मात्र आपल्याला गृहीत धरले जात नाही. आ. राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे, मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश सदस्य सुनील रासने यांनी म्हटले आहे.
या राजीनाम्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याना रासने आणि त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते भेटणार आहेत. त्यासाठी हे सर्वजण मुंबई येथील भाजप कार्यालयात हजार होते.

… तर तुतारी वाजवून टाका : खा. विखे
काही लोकांना डॉ. सुजय विखे मान्य नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सांगा आमच्या दोघांची अडचण असेल तर आ.मोनिकाताई राजळे यांचे नाव सांगा नसेल तर अरुण मुंडे यांचे नाव सांगा आमची सगळ्यांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका, असे खळबळजनक वक्तव्य खा. सुजय विखे यांनी केले आहे. मतदारसंघातील पाथर्डी येथील भाजपच्या बूथ कमिटीच्या कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे समाजात वावरत असताना समाजातील महत्व यावर बोलताना हे वक्तव्य विखे यांनी केले आहे. मात्र या वक्तव्यामुळे मतदारसंघात उलटसुलट चर्चा रंगली आहे.