21/10/2025

१२ वी परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदारांना कॉपी देताना पकडले; पाथर्डी तालुक्यातील घटना !

0
pathardi pariksha kendravar copy..

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

बारावीच्या मुलांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४२ परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे घडली आहेत. परीक्षा व्यवस्थित पार पाडाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी कॉपीमुक्त  परीक्षा उपक्रमाची अमलबजावणी करण्यास सांगितले आहे. यामध्ये शालेय शिक्षणविभागाशी इतरही विभागांचा सहभाग प्रामुख्याने दिसत आहे. मात्र पहिल्याच दिवशी ४२ परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना खुद्द नायब तहसीलदार यांनाच रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदरील ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर घडली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नायब तहसीलदाराचे नाव अनिल तोडमल असे आहे.

दरम्यान नायब तहसीलदार अनिल तोडमल यांचा मुलगा बारावीत आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. अशातच मुलाला मदत म्हणून नायब तहसीलदार पाथर्डीमधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. पेपर सुरु झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तहसीलदार  स्वत:च्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावर ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठले. आता संबंघित नायब तहसीलदार अनिल तोडमल यांच्यावर आता काय कारवाई केली जाणार याकडे आता सर्वंचे लक्ष लागलेले आहे.

मात्र सदर घटनेवेळी  तोंडमल हे परीक्षा केंद्रात खरोखरच कॉपी देण्यासाठी गेले होते का? कि दुसऱ्या कोणत्या कामासाठी तेथे गेले होते याबाबत त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया दिली गेली नाही. दरम्यान या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये परीक्षा  केंद्रावर असणाऱ्या एकाने तुम्ही इथे कशासाठी आला आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच इथे आहेत. यावर त्यांनी काहीही न बोलता शांत राहणेच पसंत केले. मात्र समोरून अधिकच विचारणा केली जात असल्याचे पाहून त्यांनी आपली ओळख सांगितली. त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार का.. ? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र नायब तहसीलदार यांनीच  आपल्या पुत्रप्रेमापोटी परीक्षा केंद्रावर जात कॉपी पुरवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनीच कॉपी पुरवल्याची घटना घडल्याने राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed