राज्यात सिबिएसई पॅटर्न…
शिक्षक, पालक, विद्यार्थी संभ्रमात; राज्य शिक्षण मंडळाचे काय…?
शिक्षक, पालक, विद्यार्थी संभ्रमात; राज्य शिक्षण मंडळाचे काय…?
राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या म्हणजेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासूनच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलासाठी अभ्यासक्रम लागू करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधान परिषदेत हि माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीनंतर देखील मंत्री भुसे यांनी राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचे संकेत दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बदलांचा स्वीकार करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसंदर्भात भाष्य केले होते. दरम्यान, इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आल्याचे देखील भुसे यांनी म्हटले आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी निगडित असणाऱ्या सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून 1 एप्रिलपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याची महती देखील मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
तसेच त्यांनी माहिती देताना असेही म्हटले आहे कि, सीबीएसई पॅटर्नमध्ये ३० टक्के सवलतीचा लाभ घेत इतिहास, भूगोल आणि मराठी भाषा याना प्राधान्य देण्यात येणार असून मराठी भाषा बंधनकारक असणार आहे. यामुळे शाळांची फी कोणत्याहीप्रकारे वाढणार नाही.
पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलासाठी आणि त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार आहे. मात्र, अचानक अशा प्रकारे शालेय शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधे संभ्रम निर्माण झाला आहे.
‘असे कोणते प्रश्न आहेत कि ज्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे ते पाहुयात……
या वर्षीपासून सीबीएसई पॅटर्न सुरुवात करून पुढील दोन वर्षात प्रार्थमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी हा राबवला जात असेल तर राज्य मंडळ आणि राज्य मदनदलाच्या अभ्यासक्रमाचे नेमकं काय होणार?
सीबीएसई परीक्षा पद्धती आणि वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक हे राज्य मंडळाचे वेळापत्रक हे पूर्णपणे वेगळे आहे, त्यामुळे सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असेल तर वेळापत्रक देखील लागू केले जाणार का?… आणि त्याच वेळापत्रकानुसार अभ्यासक्रम हा 1 एप्रिल पासून सुरू होणार का? कि राज्य मंडळानुसार १५ जून पासून सुरु होणार?
दहावी बारावी बोर्ड परीक्षा राज्य मंडळाकडून घेतल्या जातात त्यामुळे जर हा पॅटर्न लागू करण्यात आला तर सीबीएसई बोर्ड परीक्षेलाच विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार का?
पुढील दोन वर्षात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा जर निर्णय झाला असेल तर त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि सर्व इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तक निर्मिती करणे शक्य आहे का?
सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार म्हणजे जी पुस्तक सीबीएसई या शाळांमध्ये वापरली जाणार तीच राज्य मंडळाच्या शाळांमध्ये वापरली जाणार का? कि, अभ्यासक्रमामध्ये काही बदल केले जाणार?
तर सरकारी शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न सुरु झाला तर त्यांचा नेमका काय फायदा होईल ते देखील पाहुयात….
सीबीएसई पॅटर्नमुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकसारखाच अभ्यासक्रम राहील.
वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी बदल्या आणि शाळा बदलणे सोपे होईल.
सीबीएसई पॅटर्नमुळे स्पर्धांमक परीक्षांसाठी फायदा होईल
बर्याचअंशी पालक आणि विद्यार्थी या पॅटर्नसाठी अनुकूल आहेत.
दरम्यान यासाठी शिक्षकांची भरती देखील करावी लागणार आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत याबाबत कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाहीये. शिक्षकभरती देखील राकडलेली पाहायला मिळत आहे. तसेच राज्यातील अनेक शाळा विना अनुदानित आहेत. तयारी विद्यार्त्यांचे… शिक्षकांचे काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने अद्यापही अनुत्तरीतच आहेत. तरीदेखील सरकारने सीबीएसई पॅटर्न राज्यात लागू करण्यासंदर्भात जे पॉल उचलले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे नक्कीच अभ्यासक्रमात, शिक्षणात आणि इतरकाही गोष्टीत बदल हे घडलेले पाहायला मिळतील…