GHIBLI ART ANIMATION : “घिबली”चा सोशलमीडियावर ट्रेंड !

GHIBLI ART ANIMATION : “घिबली”चा सोशलमीडियावर ट्रेंड !
राजकारण्यांना देखील मोह; घिबली ऍनिमेशन म्हणजे काय?, त्याचे मालक कोण ?, संपत्ती किती ? हे जाणून घेऊयात…
देशातच नाही तर जगभरात सध्या इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर घिबली आर्टच्या अॅनिमेटेड (GHIBLI ART ANIMATION) फोटोचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि एक्स वरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीनं फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हा ट्रेंड अनेकांकडून फॉलो केला जात आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि सामाजिक तसेच राजकारण्यांकडून देखील या ट्रेन्डला फ़ॉलो करत आहेत. आपला ओरिजिनल आणि घीबीली आर्ट फोटो शेअर केले जात आहेत. मात्र, तुम्हाला घिबली अॅनिमेशन नेमकं काय आहे? ते कुठूण आले? त्याचे मालक नेमके कोण आहेत? त्यांची संपत्ती नेमकी किती आहे? हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यामाबद्दल थोडक्यात जाणून घेवूयात…
घिबली ही जपानमधील एक प्रसिद्ध अॅनिमेशन स्टुडिओ आहे, १५ जून १९८५ रोजी या स्टुडिओची स्थापन करण्यात आली. या स्टुडिओची स्थापना टोकियो, जपान येथे झाली. हायाओ मियाझाकी, तोशियो सुझुकी, इसाओ ताकाहाता आणि यासुयुशी तोकुमा या चौघांनी मिळून हा स्टुडिओ सुरू केला. घिबली हे नाव इटालियन भाषेतील “ghibli” या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ आहे “सहारा वाळवंटातील गरम वारा”. हे नाव दुसऱ्या महायुद्धातील एका इटालियन विमानाच्या नावावरून प्रेरित आहे असेही म्हटले जाते आहे.
घिबली या स्टुडिओची सुरुवात “नॉसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड” (१९८४) या चित्रपटाच्या यशानंतर झाली, त्यामुळे मियाझाकी आणि त्याच्या टीमला स्वतःचा स्टुडिओ स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर “माय नेबर टोटोरो”, “स्पिरिटेड अवे”, “प्रिन्सेस मोनोनोके” यांसारखे अनेक यशस्वी आणि कलात्मक चित्रपट त्यांनी तयार केले. आणि ते यशस्वी देखील झाले. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. घिबली अॅनिमेशन स्टुडिओच्या चित्रपटाचे जगभर चाहते आहेत. या स्टुडिओचे चित्रपट नेटफ्लिक्स वर देखील आहेत. मियाझाकी याना अनिमेशन चित्रपटांचा बादशहा म्हणून देखील ओळखले जाते.
घिबली स्टुडिओ ही एक खाजगी कंपनी आहे आणि तिचे मालकी हक्क सुरुवातीला तिच्या संस्थापकांमध्ये विभागले गेले होते. हायाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता हे प्रमुख म्हणून काम पाहत होते, तर तोशियो सुझुकी हे निर्माते म्हणून कार्यरत होते. यासुयुशी तोकुमा, जो तोकुमा शोटेन या प्रकाशन कंपनीचा मालक होता, याने सुरुवातीला घीबीली स्टुडिओला आर्थिक पाठबळ दिले.
मात्र आजच्या घडीला, स्टुडिओ घिबली स्वतंत्रपणे कार्य करत आहे, परंतु त्याचे व्यवस्थापन आणि मालकी हक्क मुख्यत्वे तोशियो सुझुकी यांच्याकडे आहेत, जे सध्या स्टुडिओचे अध्यक्ष आहेत. हायाओ मियाझाकी यांनी २०१३ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती, मात्र काही काळानंतर त्यांनी पुन्हा चित्रपट निर्मिती सुरु केली. घिबली स्टुडिओचे चित्रपट जागतिक स्तरावर वितरणासाठी डिस्ने आणि नेटफ्लिक्स यांसारख्या कंपन्यांशी करार करण्यात येत असतात. अद्यापही घिबिलीचे मालकी हक्क हे मूळ मालकांकडे आहेत. हयाओ मिंयाझाकी यांच्या पुढाकारातूनच घीबीलीची निर्मिती झाली आणि आजतागायत सुरु आहे.
घिबली स्टुडिओचे मालक हायाओ मियाजाकी यांची संपत्ती 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती कुठेही उपलब्ध नाही. अॅनिमेशनच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मियाजाकीची यांची ओळख आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य मार्ग घिबली स्टुडिओचा व्यवसाय आहे. डीव्हीडी, मर्चंटस सेल्स आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग हक्क या द्वारे घिबली स्टुडिओची कमाई होते.
घीबीली स्टुडिओ हा त्याच्या पर्यावरणप्रेमी संदेश, विविधांगी कथा आणि अप्रतिम अॅनिमेशनसाठी ओळखला जातो. त्याचे बहुतांश चित्रपट जपानच्या संस्कृती आणि निसर्गावर आधारित असतात.
ChatGPT मुळं घिबली स्टुडिओला किती धोका? हे देखील जाणून घेवूयात….
चॅटजीपीटी च्या फोटो जनरेशन फीचर्सचा परिणाम घिबली स्टुडिओवर किंवा त्यांच्या संस्थापकांच्या कमाईवर किती परिणा होईल हे अद्याप समोर आलं नाही. एआय जनरेटेड अॅनिमेशनच्या या ट्रेंडमुळं घिबली स्टुडिओच्या चाहत्यांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. मियाझाकी यानी देखील यावर टीका केली आहे. एआय जनरेटेड अॅनिमेशन पाहून मला पूर्णपणे वैताग आला आहे, हा मानवी जीवनाचा अपमान असल्याचे २०१६ मध्ये त्यांनी मिंयाझाकी यांनी म्हटले होते. त्यामुळे भविष्यात चाट-जिपीटीमुळे नेमका काय धोका होऊ शकतो किंवा त्यावर काही पर्याय शोधले जातात का ? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.