विकी कोशाचा छावा १०० कोटी पार..!

0
chava

विकी कोशाचा छावा १०० कोटी पार..!

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 3 दिवस झाले आहेत. संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशल आणि रश्मीकाचं या सिनेमामुळे जणू नशीबच उजळले आहे. विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज तर रश्मीने मदन यांनी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मीने मंदाना या दोघांचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. देशभरात या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मात्र प्रदर्शनापूर्वी या चित्रपट वादात अडकतो कि काय असे असतानाच दिग्दर्शक उतेकर यांनी यातील महाराजांचे एक गाणे काढून टाकले. मात्र आता चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचा बोर्ड झळकताना दिसत आहे.

Maddock प्रॉडक्शनने बनवलेल्या छावा या सिनेमाच्या रिलीज दिवशी कमाईचा मोठा आकडा पार केला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 31.1 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 39.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 70.40 कोटींची कमाई केली आहे. तर आज तिसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत या चित्रपटाने सुमारे 33.37 कोटींची कमाई केली असून १०० कोटी च्यापलीकडे झेप घेतली आहे.

छावा या सिनेमाने अवघ्या 3 दिवसात 100 कोटींची कमाई करून स्काय फोर्सचा रेकॉर्ड मोडला आहे. अक्षय कुमारच्या स्कायफोर्सने 8 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला होता. त्याचबरोबर छावाने यापेक्षा तिप्पट वेगाने कमाई करत 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. लवकरच हा चित्रपट २०० कितींचा टप्पा लवकरच पार करील असेच चित्र सध्या आहे.

विकी कौशलच्या सर्व चित्रपटांपैकी एकाही चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडला नव्हता. याआधी फक्त त्याच्या उरी द सर्जिकल स्ट्राइकने पहिल्या आठवड्यात 35.73 कोटी रुपयांची कमाई केली होती. याशिवाय त्याच्या ‘राझी’ चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कमाई हि 32.94 कोटी रुपये एवढी होती. छावा या सिनेमाने सर्व विक्रम मोडीत काढत हा चित्रपट विकी कौशलचा पहिल्या आठवड्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

दरम्यान असे म्हटले जाते कि, छावा हा चित्रपट 130 कोटी रुपयांना बनवण्यात आला आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि विनीत कुमार सिंग यांसारखे मोठे चेहरेही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसत आहेत. या चित्रपट पाहताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर तरळू लागतो. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.