लाडकी बहीण योजनेत बदल; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय !

लाडकी बहीण योजनेत बदल; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय !
राज्यातील ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण (ladki bahin yojana) ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण सात हाफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, आता लवकरच फेब्रुवारीचा हाफ्ता देखील महिलांच्या खात्यात जमा होईल असे म्हटले जात आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात यापुढे नियमित हप्ता सरकारकडून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या आणि इतर बाबतीत मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
लाडकी बहीण हि योजना सुरू केली गेली त्यावेळी या योजनेसाठी काही अटी देखील होत्या. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावं. लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावं. तसेच इतर देखील काही अटी होत्या. मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला. ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत अशा सुमारे साडेपाच लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे.
तसेच यापुढे आता लाडक्या बहिणींना दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई – केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. लाभार्थी हयात आहे कि नाही याचीही तपासणी केली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास यापुढे लाडक्या वहिनींना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करून लाडक्या बहिणी या योजनेस पात्र आहे कि नाही हे ठरवण्यात येणार आहे
यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार yani म्हटले आहे कि, शेतकाम करणारी महिला, धुणीभांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे वीस हजार रुपये आहे, अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही, अशा महिलांसाठी ही योजना आहे. आधी अशी चर्चा सुरू होती, की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच अपत्य असावीत. मात्र नंतर असं लक्षात आलं, ज्या महिलांचा पगार हा चाळीस हजार रुपये आहे, घरी चारचाकी गाडी आहे, अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता जो लाभ दिला आहे, तो परत घेणार नाही. लाभ दिला आहे तो परत घेणार नाही, भाऊबीज, राखी पौर्णिमा भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही. काही महिलांनी नावं मागे घेतली आहेत. मात्र हि योजना पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे.