15/02/2026
नवदांपत्यांना मिळणार थेट "विठ्ठल दर्शन"

नवदांपत्यांना मिळणार थेट "विठ्ठल दर्शन"

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीची बैठक पार पडली त्यामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. नवीन निर्णयांनुसार नव्याने लग्न केलेल्या जोडप्यांना विठ्ठलाचे थेट दर्शन (vitthal darshan) घेता येणार आहे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. तसेच अंध, अपंग याना देखील थेट दर्शन मिळणार आहे. त्यामुळे ताटकळत उभे राहण्याची गरज नसणार आहे.

राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते. मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदांपत्याला तासंतास तिष्ठत उभे राहावे लागते. आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदांपत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे. यासोबतच अंध अपंगांना देखील थेट दर्शन मिळणार आहे.

तसेच दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार आहे. यासह अनेक निर्णय विठ्ठल मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यांत आले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed