19/02/2026
sidhivinayak dresscode

सिद्धिविनायक दर्शनासाठी ड्रेसकोड; मंदिर प्रशासनाचा निर्णय

मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताना भाविक भक्तांना आता ड्रेस कोडच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. याबाबत आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावेत, असे आवाहन सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून भाविकांना करण्यात आले आहे.

दरम्यान, सिद्धिविनायक गणपतीरायाचे, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती देताना सिद्धिविनायक मंदिर सदस्य राहुल लोंढे यांनी म्हटले आहे कि, पुढच्या आठवड्यापासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. काही भक्तांच्या तक्रारी , सूचना देवस्थान ट्रस्टकडे आल्या होत्या. काही भाविकांचे पेहराव समोरच्याला संकोच वाटणारे असायचे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल तर मंदिर प्रशासनाकडून त्यांना प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed