शिर्डी संस्थानमध्ये चांगल्या आरोग्य सुविधेसाठी प्रयत्न करणार : प्रभावतीताई घोगरे

शिर्डी संस्थानमध्ये चांगल्या आरोग्य सुविधेसाठी प्रयत्न करणार : प्रभावतीताई घोगरे
राहाता – शिर्डी संस्थानच्या हाॅस्पिटलमध्ये कमी अधिक प्रमाणात सुविधा मिळत आहे. मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील रुग्णांना येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावतीताई घोगरे यांनी केले.राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलींना व प्रत्येक गावातील चौक सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. घोगरे यांच्या स्वागताची तयारी अनेक गावात जल्लोषात करण्यात येत आहे. या वेळी महाविकास आघाडीचे तालुक्यातील नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी अनेकांनी शिर्डी देवस्थानच्या रुग्णालयात आरोग्य सुविधा कमी मिळत असल्याच्या तक्रारी मांडल्या. देवस्थानच्या रुग्णालयातील सर्वच माहिती घेतल्यानंतर त्यावर घोगरे यांनी नागरिकांना वरील आश्वासन दिले
घोगरे म्हणाल्या, शिर्डी देवस्थानच्या रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत असल्या तरी तुटपुंज्या स्वरुपातील सुविधा तेथे आहेत. विशेष म्हणजे पूर्वी सारखे डाॅक्टरही तेथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना उपचार करताना अडचणी येत आहेत. आपण या रुग्णालयात डाॅक्टरांची संख्या वाढण्यासाठी व येथे चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आमदार झाल्यानंतर प्राधान्याने हा प्रश्न सोडविणार आहे, असे त्या म्हणाल्या.
राहात्यात परिवर्तन अटळ
गेल्या अनेक वर्षांपासूनची कार्यकर्ते व मतदारांमधील नाराजी आता बाहेर येऊ लागलेली आहे. या अगोदर तालुक्यातून सक्षम उमेदवार मिळत नसल्याने कार्यकर्त्यांसह मतदारांच्या मनातील नाराजी दिसून येत नव्हती. परंतु आता महाविकास आघाडीकडे प्रभावीतताई घोगरे यांच्या सारखा सक्षम उमेदवार मिळाल्याने नागरिकांची नाराजी उघडपणे बाहेर .येऊ लागलेली असून राहात्यात परिवर्तन होणार हे प्रत्येकजण बोलू लागला आहे.शिर्डी विधानसभा निवडणुकीत या अगोदर राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात सक्षम उमदेवार उभा राहत नसल्याने त्यांचा विजयी मार्ग सुकर होत होता. मात्र .या पंचवार्षिक निवडणुकीत विखे यांच्या विरोधात प्रभावती घोगरे यांचे आव्हान उभे राहिलेले आहे. त्यामुळे विरोधी गटात अवस्थता निर्माण झालेली आहे.
या अगोदरच्या निवडणुकांच्या वेळी विरोधकांनी कधीच गांभिर्याने कोणत्याच गोष्टी घेतल्या नाहीत. परंतु या वेळी विखे यांनी ही उमेदवार सक्षम असल्यामुळे निवडणूक गांभिर्याने घेतलेली असून मतदारांच्या गाठीभेटी वाढविलेल्या आहेत. परंतु कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.या उलट घोगरे यांच्या गोटात दिवसेंदिवस तालुक्यातील विरोधकांकडे असलेली नाराज मंडळी दाखल होत आहे. त्यामुळे घोगरे यांची तालुक्यात ताकद वाढत चाललेली आहे. परिणाम घोगरे यांच्या मतांचा गठ्ठा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याची धास्ती मात्र विरोधकांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांसह नातेवाईकांना त्यांनी प्रचाराच्या कामाला लावले असल्याचे दिसून येत आहे.
सध्या तालुक्यातील नाराज मंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या वेळी काही झाले तरी परिवर्तन होणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. घोगरे यांच्या पाठीशी जनता सक्षमपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. घोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून राहात्यात अनेकांनी प्रचार सुरु केलेला आहे. सुरवातीला काहींनी चोरी चोरी छुपके छुपके प्रचार केलेला आहे. परंतु आता त्यांची दडपशाहीला झुगारून अनेक नाराजांनी आपली नाराजी उघडपणे दाखविण्यास सुरवात केलेली आहे. त्यामुळे घोगरे यांचा मताचा आकडे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा मताचा वाढता आकडा घोगरे यांना विजयाचा जवळ घेत जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यामुळे परिवर्तन अटळ होणार असल्याचे तालुक्यातील सर्वसामान्य जनता बोलत आहे. सर्वसामान्यांचे बोल खऱे ठऱणार असल्याची चर्चा सुरु आहे.