Sharad Pawar : शरद पवार यांच्या 50 सभा होणार; शेवटची सभा अजित पवारांचे टेन्शन वाढवणार !

Sharad Pawar : शरद पवार यांच्या 50 सभा होणार
sharad pawar – विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra assembly election) प्रचार चांगलाच शिगेला पोहचलेला दिसतोय. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या कडून राज्यात विविध ठिकाणी नेत्यांच्या सभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रकारे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (sharad pawar) पुढच्या 10 दिवसांत तब्बल 36 सभा घेणार आहेत. त्यांची शेवटची सभा हि बारामती येथे होणार आहे.त्यामुळे ती निर्णायक सभा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान 6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत शरद पवारांच्या एकूण 50 सभांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठीचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. खा. पवार आज दि 9 नोव्हेंबर रोजी उदगीर, परळी, आष्टी आणि बीड विधानसभेसाठी सभा घेणार आहेत.
सभांच्या तारखा आणि ठिकाण खालीलप्रमाणे –
10 ऑक्टोबर- परंडा, शेवगाव, गंगापूर, घनसावंगी
11 ऑक्टोबर- एरंडोल, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
12 ऑक्टोबर- कळवण, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव
13 ऑक्टोबर- रहाता, श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, भोसरी
14 ऑक्टोबर- चिंचवड/पिंपरी रॅली
15 ऑक्टोबर- तासगाव कवठे महाकाळ, चंदगड, कराड उत्तर
16 ऑक्टोबर- वाई, कोरेगाव, माण, फलटण
17 ऑक्टोबर- करमाळा, माढा, कर्जत जामखेड
18 ऑक्टोबर- भोर, दौंड, इंदापूर, बारामती
बारामती मतदारंघात खा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवखे युगेंद्र पवार आणि उपममुख्यमंत्री अजित पवार यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे शेवटच्या सभेसाठी शरद पवार यांनी बारामती हा मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विजयाचा मार्ग खडतर होणार आहे.