indian railway : भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच!

जनतेच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने एक सुपर ॲप लाँच (indian railway lunch super app) करण्याची घेषणा केली आहे.
जनतेच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेने एक सुपर ॲप लाँच (indian railway lunch super app) करण्याची घेषणा केली आहे. या ॲपच्या मदतीने, रेल्वेच्या विविध सेवा प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याच ॲपद्वारे प्रवाशांना नोंदणी करून सेवांचा लाभ घेता येणार आहे. आता रांगेत उभे राहावे लागणार नाही.
आतापर्यत रल्वेची तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसी ॲपचा वापर केला जात होता. ट्रेनचे लोकेशन जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम ॲपची मदत घ्यावी लागते. तर, एखादी तक्रार करायची असल्यास थेट रेल्वे ऑफिस किंवा 139 नंबरचा वापर करावा लागत होता. आता मात्र, रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान रेल्वेने ॲडव्हान्स रिजर्वेशनचे नियम बदलले आहेत. नव्या नियमानुसार आता प्रवासी फक्त 60 दिवस आधी तिकीट बुक करू शकतात. पूर्वी हा कालावधी 120 दिवसांचा होता. हे नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.