15/02/2026

Sandesh Karle : संदेश कार्लेंना आघाडी-युतीच्या नाराजांची मदत; विजयाचा मार्ग होणार सुकर

0
sandesh karle

Sandesh Karle : संदेश कार्लेंना आघाडी-युतीच्या नाराजांची मदत; विजयाचा मार्ग होणार सुकर

अहिल्यानगर ः शिवसैनिकाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पारनेर नगर मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले (sandesh karle) यांनी घेतलेला आहे. हा निर्णय योग्य ठरत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यामधील अनेक नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा छुपा पाठिंबा असल्याने आपणच विजयी होणार असा विश्वास अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी व्यक्त केला.

दरम्यान कार्ले यांना नगर तालुक्यासह पारनेर तालुक्यातून शिवसैनिकांसह महाविकास आघाडीसह महायुतीतील नाराज मंडळींकडून पाठिंबा मिळत असल्याने ही निवडणुूक चुरशीची होत असल्याचे दिसून येत आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात शिवसैनिकांची विचार बैठक निमगाव वाघा करून कार्यकर्त्यांशी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश  कार्ले यांनी चर्चा केली.  आजही ही सर्व मंडळीं संदेश कार्ले यांच्याबरोबर दिसून येत आहे. सध्या नगर तालुक्यात कार्ले यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. पारनेर तालुक्यातही त्यांच्याकडून प्रचार सुरू असून कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना दिवसागणिक वाढत चालल आहे. 

कार्ले यांच्या संपर्कात महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतील नाराज मंडळी येत असून त्यांना पाठिंबा देत आहेत. नव्या दमाचा आमदार म्हणून कार्ले यांच्याकडे पाहिले जात आहे. कार्ले यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून अनेक विकास कामे केलेली आहेत. 

ही कामे प्राधान्याने पुढेही होतील, अशी आशा सर्वांना आहेत. त्यामुळे या वेळी कार्ले यांना आमदारकीला संधी द्यायची असा निर्धार कार्यकर्त्यांनी केलेला असून सर्वजण दिवसरात्र प्रचारात मग्न झालेले दिसून येत आहे. 

महाविकास आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याची कार्ले यांना साथ असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवासाठी उत्तरेतून साथ दिली जात असल्याची चर्चा आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed