21/02/2026

Heena Gavit : हिना गावित यांचा भाजपाला रामराम ; अपक्ष निवडणूक रिंगणात !

0
heena gavit

हिना गावित यांचा भाजपाला रामराम ; अपक्ष निवडणूक रिंगणात !

नंदुरबार : नंदुरबारमध्ये भाजपला (BJP) एका माजी खसदाराने मोठा धक्का दिला आहे. भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ वाटाघाटींमध्ये शिवसेना शिंदे गट याना गेल्याने मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. याचा आपल्याला मोठा फायदा होणार असल्याचे त्या म्हटल्या.

माजी खासदर हीना गावित यांचा जन्म 28 जून 1987 रोजी नंदूरबार येथे झाला. त्या डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या आहेत. हीना गावित या 2014 साली लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. त्यावेळी हीना गावित या 26 वर्षांच्या होत्या. हीना गावित यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली होती. पंतप्रधान मोदी यांनीही हीना गावित यांचे कौतुक केले होते. 2019 मध्येही हीना गावित लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल असे वाटत असतानाच पक्षाने त्यांना संधी दिली नाही. मात्र त्यावेळी त्या थांबल्या. तसे असताना आता विधानसभेला तरी आपल्याला असंधी मिळेल असे वाटत असताना त्यांचा हक्काचा मतदारसंघ शिंदे गटाला गेला. त्यांनी शेवट्पत्यांत प्रयत्न केले. मात्र आता त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपेक्षा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed