काशिनाथ दाते याना पवारांकडून उमेदवारी; पारनेरमध्ये लंके विरुद्ध दाते सामना रंगणार

काशिनाथ दाते याना पवारांकडून उमेदवारी
पारनेर – राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षाकडून खा. शरद पवार (sharad pawar) यांनी पारनेर या विधानसभा मतदारसंघासाठी खासदार निलेश लंके (nilesh lanke) यांच्या पत्नी राणी लंके याना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके तसेच त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. महायुतीकडून मात्र या जागेवर अद्याप उमेदवार ठरला नव्हता. मात्र, उपुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पारनेरच्या जागेसाठी उमेदवार दिला आहे. येथून राष्ट्रवादीकडून काशीनाथ दाते (kashinath date) हे निवडणूक लढवणार आहेत. म्हणजेच या जागेवर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे. दाते यांनी याअगोदर मार्केटकमिटीवर काम केले आहे. तसेच संघटनात्मक अनुभव देखील आहे.
दरम्यान याठिकाणी काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी राष्ट्रवादी कडून इच्छुक असणारे माजी जिल्हापरिषद सदस्य सुजित पाटील झावरे, माधवराव लामखडे,शिवसेना उबाठा चे डॉ.श्रीकांत पठारे, संदेश कार्ले हे काय भूमिका घेतात.हे पहाणे महत्वाचे आहे. कार्ले यांनी शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी लढणार असल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक देखील घेतली होती.