शिवसैनिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढणार : संदेश कार्ले

शिवसैनिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढणार : संदेश कार्ले
अहमदनगर – शिवसैनिकाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पारनेर नगर मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले (sandesh karle) यांनी केलेला आहे.पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात शिवसैनिकांची विचार बैठक निमगाव वाघा आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला पंचायत समिती माजी सभापती प्रविण कोकाटे, माजी सभापती रामदास भोर, डॉ. श्रीकांत पठारे, , माजी जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, संदीप गुंड, विश्वास जाधव , तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, युवा सेना उपाध्यक्ष प्रविण गोरे, बाबा टकले,, विलास शेडाळे मिठू, कुलट, व, शंकर ढगे, ज्ञानेश्वर बर्वे, विठ्ठलराव पठारे , जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते.
या बैठकीला संबोधित करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले म्हणाले कि, पक्षाचे तिकिट मिळाले तर नाही तर अपक्ष उमेदवारी करणार आहे. नगर शहरासह तीनही मतदार संघात शिवसेना जिंवत ठेवण्यासाठी २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. पारनेर शिवसेनेचीमधून डॉ. श्रीकांत पठारे हे देखील उमेदवारी अर्ज भरणार आहे.
पारनेरमधील शिवसेनिकाचा मेळावा झाला. त्यात उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला .यावेळी कार्यकर्त्याचे उमेदवारी बाबत मते जाणून घेतले असता आता निवडणूक लढवायची मागे हटायचे नाही, असा सूर सर्वांचा आला आहे. आम्ही संदेश कार्ले यांच्या पाठीशी उभे आहेत, असे सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.