ईपीएफओच्या नियमांत बदल : कर्मचाऱ्यांना पीफ खात्यातून काढता येणार एवढी रक्कम

0
Epfo Image

ईपीएफओच्या नियमांत बदल : कर्मचाऱ्यांना पीफ खात्यातून काढता येणार एवढी रक्कम

देशातील नोकरदारांना भविष्यातील संकटांना सामोरे जाता यावे म्हणून सरकारने ईपीएफओची सुविधा सुरु केलेली आहे. ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांचे प्रतिमहिना एक निश्चित अशी रक्कम कापली जाते. हीच कापलेली रक्कम निवृत्तीनंतर ठरवण्यात आलेल्या व्याजासह परत नोकरदारांना निवृत्तीवेतनाच्या रुपात पुन्हा दिली जाते. याच निधीचा नोकरीदरम्यान वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, याबाबतच्या नियमांत आता सरकारने बदल केला असून या नव्या नियमानुसार आता आधी ठरवण्यात आलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे. त्यामुळे आपल्या संकटकाळात त्यांना मदत होणार आहे.

Epf Images

ईपीएफओ ने आपल्या वैद्यकीय निधीसाठीच्या पैसे काढण्याच्या नियमांत बदल केला आहे. अगोदर कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपये काढता येत होते. आता मात्र एक लाखांपर्यंत त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ईपीएफओने यासंदर्भात 16 एप्रिल रोजी जारी परिपत्रक जरी केले आहे. याच परिपत्रकामध्ये या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे.

EPFO ने फॉर्म 31 च्या पॅरा 68J अंतर्गत पीएफमधून आंशिक पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. ईपीएफच्या फॉर्म 31 अंतर्गत निवृत्तीवेतनासाठी तुम्ही जमा करत असलेल्या रकमेतून आंशिक रक्कम काढता येते. घर खरेदी, लग्न, वैद्यकीय उपचार या व इतर कामांसाठी पीएफ खात्यातून आंशिक रक्कम काढता येते.

Epfo Image

यावेळीच काढता येणार एक लाख रुपये
ईपीएफओनुसार आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळातच हे एख लाख रुपये काढता येतील. खुद्द कर्मचारी किंवा कर्मचाऱ्याचे कुटुंबीय रुग्णालयात भरती असतील, तेव्हा ही रक्कम काढता येईल. त्यासाठी कर्मचारी शासकीय रुग्णालय किंवा नियमांत बसणाऱ्या रुग्णालयात दाखल असणे गरजेचे आहे. रुग्ण एखाद्या खासगी रुग्णालयात दाखल असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर पीएफमधील 1 लाख रुपये काढता येतील असे या परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान या बदलामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा आधार मिळणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © 2024 All rights reserved Shyadri Express | CoverNews by AF themes.