प्रदर्शनापूर्वीच “पुष्पा -२” ने कमावले १२०० कोटी ?

प्रदर्शनापूर्वीच "पुष्प -२" ने कमावले १२०० कोटी
अल्लू अर्जुनाचा नवा रेकॉर्ड
SOUTH PUSHPA 2 – दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ ची प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड ब्रेक केला आहे, 500 कोटींचा बजेट असणाऱ्या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई केली आहे.

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्प या चित्रपटाने सगळ्यांची मने जिंकली होती. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले होते. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटानं KGF 2 आणि RRR या चित्रपटाचे प्रदर्शित होण्या आधीचे रेकॉर्ड मोडले आहेत.
दरम्यान असे म्हटले जाते कि, ‘पुष्पा 2’ च्या हिंदी डब व्हर्जनसाठी कथितपणे 200 कोटींची डील केली होती. तर दक्षिण भारतात डिस्ट्रीब्यूशनसाठी 270 कोटी रुपयांचे थिएटर राइट्स विकले गेले आहेत. तर परदेशात 100 कोटी पेक्षा जास्तची डील झाली आहे.

तसेच OTT वर प्रदर्शनासाठी नेटफ्लिक्सनं ‘पुष्पा 2’ च्या स्ट्रीमिंगचे राइट्स 275 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. माहितीनुसार, ऑडियो आणि सॅटेलाइट्स राइट्सची एकूण डील ही निर्मात्यांना 450 कोटींची झाली आहे. या आकड्यांवरून एक माहिती समोर आली आहे की 1295 कोटींची कमाई चित्रपटाने आधीच केली आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा एक नवा रेकॉर्ड मानला जात आहे, त्यामुळे असेच अजून काही रेकॉर्ड पुष्प २ मॉडेल असे जाणकारांचे मानाने आहे.