“डॉ. सुजय विखे” मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

डॉ. सुजय विखे मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार
२२ एप्रिलचा मुहूर्त; जिल्यातील आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित
ujay Vikhe patil News : अहिल्यानगर (नगर) दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे २२ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित आपला लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली आहे.

अभय आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, माजी मंत्री तथा जिल्हाबॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
अहिल्यानगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीला सुरवात करणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.