महावितरणमध्ये “विद्युत सहाय्यक” पदासाठी 5347 जागा

महावितरणमध्ये "विद्युत सहायक" पदासाठी 5347 जागा
Mahavitaran Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे 5347 पदे भरली जाणार आहेत, त्यामुळे महावितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आली आहे. त्यामुळे वेळ वाया न घालता सर्वानी अर्ज करावा.

सह्याद्री Express
दरम्यान महावितरणकडून विद्युत सहाय्यकची सुमारे 5347 पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीसाठी अर्ज करण्यास खाहीच हरकत नाही. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून, ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. त्यासाठी https://www.mahadiscom.in/ या महावितरणच्या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी 250 रूपये परीक्षा शुल्क असणार आहे. 18 ते 27 वयोगटातील उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात.
तसेच प्रवर्ग निहाय जागांचा तपशील कंपनीच्या साईटवर जाऊन पाहावा. तसेच यासाठी १२ वी आणि वीजतंत्री किंवा तारतंत्री कोर्स उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.