निवडणूक काळातील व्यवहारांवर RBI ची नजर

निवडणूक काळातील व्यवहारांवर RBI ची नजर
पेमेंट कंपन्या, बँकांना निर्देश; … तर अहवाल मागवणार
ELECTION RBI – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर निवडणूक पारदर्शक स्वरूपात व्हावी यासाठी निवडणुकीवर करडी नजर ठेवत असते, १९ एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. मात्र यादरम्यान होणाऱ्या छोट्या मोठया ऑनलाइन व्यवहारावर RBI लक्ष ठेवून आहे, कारण उमेदवार किंवा संबंधित अशाप्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्यवहार करू शकतात. त्यामुळे पेमेंट कंपन्या, बँकांना 15 (april) पत्र पाठवून काही संशयित व्यवहार झाल्यास अहवाल मागवला जाणार आहे, त्यामुळे व्यवहार करताना चांगलाच चाप लागणार असे दिसतेय.

दरम्यान निवडणुकीच्या काळात रुपये, पैशांची हेराफेरी करण्यात येते, मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्यात येते. काही ठिकाणी युपीआयच्या माध्यमातून मोठ-मोठ्या रक्कमा अथवा छोट्या रक्कमा पाठविण्यात येतात. खात्यातील या व्यवहारांवर केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून लक्ष ठेलवले जात आहे. त्यांनी पेमेंट कंपन्यांना याविषयीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पेमेंट कंपन्या, बँकांना निर्देश
निवडणूक काळातील संशयित व्यवहारांवर आरबीआय, तसेच अनेक छोट्या-छोट्या व्यवहारांवर पेमेंट कंपन्यांचे, आणि बँकांचे लक्ष असणार आहे. त्यासाठीचे आदेश RBI ने 15 एप्रिल रोजी पेमेंट कंपन्या आणि बँकांना दिले आहेत. त्यानुसार, पेमेंट प्रणालीआधारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करणारे समोर येणार आहेत, उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना प्रभावित करण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा दुरुपयोग करु शकतात. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आरबीआय प्रत्येक व्यवहारावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे व्यवहार हे पारदर्शकच ठेवावे लागणार आहे.

… तर RBI अहवाल मागवणार
निवडणुकीदरम्यान काही संशयित व्यवहार वाटल्यास बँक किंवा UPI कंपन्यांना माहिती आरबीआयला द्यावी लागणार आहे. तसेच अशा व्यवहारांची यादी, क्रमांक आणि समोरील व्यक्तीची माहिती याविषयीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे. तसेच युपीआय, कार्ड पेमेंट, ऑनलाईन पेमेंटवर देखील अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे.