शालेय शिक्षण विभागाच्या खात्यात चोरी, 47 लाख 60 हजार गायब

शालेय शिक्षण विभागाच्या खात्यात चोरी
MUMBAI MANTRALAY NEWS – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे. आरोपींनी शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेली हि रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. दरम्यान ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती कोलकाता येथील आहेत.
निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. तसेच मंत्रालयात एवढी सुरक्षा असताना, सीसीटीव्ही असताना अशा घटना घडत आहेत, त्यामुळे नागरिकांतून संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.