आयटी जॉब : टेक महिंद्रात ६००० जागा भरणार

आयटी जॉब : टेक महिंद्रात ६००० जागा भरणार
IT JOB NEWS : देशातील IT क्षेतरतील प्रसिद्ध अशी कंपनी TECH MAHINDRA कंपनीत सुमारे ६००० जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये विविध पदांसाठी फ्रेशर्सला देखील संधी प्राप्त होणार आहे. कामगारांची हि भरती प्रक्रिया २३-२४ या वर्षात होणार आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित जोशी यांनी दिली आहे.
दरम्यान कंपनी दर तिमाहीत 1,500 पेक्षा जास्त नवीन कामगारांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच या वर्षभरात आम्ही 50000 हून अधिक कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (AI) प्रशिक्षण देणार आहोत. तसेच कंपनी करत असलेल्या विविध कामांची माहिती श्री.जोशी यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात देशातील प्रामुख्याने महाराष्ट्रातील IT क्षेत्रातील शिक्षण झालेल्याना हि एक नामी संधी आहे.