देशात महागाई दारात वाढ; RBI ची माहिती

देशात अन्नधान्य महागाईचा दर पूर्वी ५ टक्के होता तर तोच आता 8.52 टक्के आहे.
INDIA FOOD NEWS – राज्यासह देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे, कारण या कृषिप्रधान भारतात शेती हि पावसावर अवलंबून आहे, आणि शेती उत्पादन वाढवण्यावर भर दिला तरच महागाई कमी होऊ शकते. देशात अन्नधान्य महागाईचा दर पूर्वी ५ टक्के होता तर तोच आता 8.52 टक्के आहे. उष्णतेच्या लाटेमुळं आणि जागतिक तणाव यामुळे हा महागाई दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

आरबीआयने माहिती दिली आहे कि, भविष्यात देशातील महागाई कमी होईल त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सर्व स्तरातून केले जात आहे. RBI ने म्हटले आहे कि, देशामध्ये पुरवठा साखळी विकसीत होईल. अन्न पुरवठ्याचे वेगवेगळे स्त्रोत उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळं अन्नपदार्थांच्या किंमतीत झालेली वाढ कमी होईल. देशातील सामान्य लोकांच्या बऱ्यापैकी पैसा हा अन्नपदार्थावर म्हणजे खाण्यावर खर्च होतो. अन्नपदार्थाच्या किंमती कमी होण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे. उत्पादकता वाढल्यामुळं महागाईचा दर आपोआप कमी होईल. त्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जात आहेत. यासाठी शासन दरबारी देखील प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाने कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवेळी पाहिजे, ज्याचा फायदा महागाई कमी करण्यास होईल. दरम्यान, मार्च 2024 मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 4.85 टक्क्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, एप्रिल महिन्यात महागाई दरात वाढ झाली आहे. अशी माहिती RBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.तसेच जागतिक तणाव आणि वातावरणातील बदल यामुळे महागाई वाढते, भविष्यात काही अशी महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच तेलांच्या किमती देखील बांधण्याची शक्यता आहे, यासाठी जागतिक परिस्थितीवर निर्भर असणार आहे.