शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार : शिवसेनाचा (UBT) वचननामा जाहीर

SHIVSENA (UBT) JAHIRNAMA NEWS – लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काँग्रेस, भाजप नंतर आपला वचननामा आज जाहीर केला आहे. या वाचनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून उपकरणांवरचा जीएसटी रद्द करू तसेच महिलांना नोकरीत 50 टक्के आरक्षण देऊ असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषद दिले आहे, यावेळी आपला विस्तृत वचननामा प्रसिद्ध केला.
ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय?
१|) राज्यात चाललेली लूट थांबवू, महाराष्ट्राचं वैभव वाढवू.
२) वित्तीय केंद्र नव्याने उभारू, युवकांना नोकरीच्या संधी देऊ.
३) जिल्हा रुग्णालये अद्यायावत करू.
४) ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करणार.
५) शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीकविमाचे निकष बदलू.
६) बी बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करु.
७) तसंच, शेतकऱ्यांना गोदामं, शितगृह देऊ.
८) कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करून, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगणार.
९) हमीभाव शेतकऱ्यांना देणारच
१०) उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू
११) सत्तेचं विकेंद्रीकरण करु
१२) कर दहशतवाद थांबवू
१३) जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवू
१४) सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.
१५) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ.
१६) जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करू.
हा तर युटर्ननामा – बावनकुळे
नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे. जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नाही.