आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य; अन्यथा होणार कारवाई

आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य; अन्यथा होणार कारवाई
PAN ADHAR CARD LINK NEWS – पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्ला सरकारकडून अनेक वेळा दिला गेला आहे. पॅन कार्डमध्ये कोणतेही बायोमेट्रिक नसतात, त्यामुळे ते आधारशी लिंक करा असे नेहमी सांगितले जाते, मात्र अजूनही अनेकांनी पॅन आधारशी लिंक केलेलं नाही. आता टॅक्स भरणाऱ्यांना एक शेवटची मुदत देण्यात आली आहे, त्यानुसार लवकरात लवकर करदात्यांना आपले पॅन आधारशी लिंक करावे लागणार आहे.
आयकर विभागाने म्हटले आहे की जर करदात्यांनी 31 मे 2024 पर्यंत त्यांचं पॅन आधारशी लिंक केलं तर टीडीएसच्या कपातीसाठी कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र पॅन लिंक न केल्यास मात्र कारवाई केली जाईल. आयकर नियमांनुसार, पॅन बायोमेट्रिक आधारशी लिंक नसल्यास, लागू दराच्या दुप्पट दराने टीडीएस कापला जाईल. करदात्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत की त्यांना टीडीएस/टीसीएसच्या ‘शॉर्ट डिडक्शन/कलेक्शन’ मध्ये डिफॉल्ट झाल्याच्या नोटिसा मिळत आहेत, असं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हटले आहे.
सीबीडीटीने म्हटले आहे की, 31 मार्च 2024 पर्यंत केलेल्या व्यवहारांसाठी आणि जिथे 31 मे किंवा त्यापूर्वी आधारशी लिंक केल्यामुळे पॅन सक्रिय झालेल्या प्रकरणांमध्ये 2024 मध्ये टॅक्स डिडक्ट करण्याचं बंधन राहणार नाही.
पॅन कार्ड चालू आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही, आणि करदात्यांना यासाठी कपात करणाऱ्या डिडक्टरवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे सध्या जास्त दिलासा दिला जाऊ शकत होता, तिथे तो देण्यात आला आहे. यामुळे आता आधार पॅन लिंक करणे करदात्यांना गरजेचे आहे अन्यथा आपले कार्ड बंद पडण्याची भीती आहे, तसेच कारवाई देखील केली जाऊ शकते.