श्रीगोंदा बाजारसमिती कारभार सचिवाविना

Lavc58.18.100
सभापती अतुल लोखंडे याची कारभाराची चौकशीची मागणी
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती कायमच कोणत्या न कोणत्या कारणातुन कायम चर्चेत असते. बाजार समितीचे सचिव यांचे वर्षभरात काम कमी आणि रजाच जास्त होत आहेत, आताही काही दिवसांपासून सचिव रजेंवरच असल्याने बाजार समितीचा कारभार रामभरोसेच सुरु आहे. तसेच अनेक गैरकारभार येथे सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सचिवांना कोणाचा तरी वरदहस्त असल्याची चर्चा दबक्या आवाजात तालुक्यात सुरु आहे. तसेच आता सभापती अतुल लोखंडे यांनी सचिवांच्या कारभाराची चौकशी कर्णयची मागणी केली आहे.
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या सततच्या सुट्टीमुळे बाजार समितीतील अनेक कामे पडून आहेत. गेल्या काही वर्षात सचिवांनी येथे गैरकारभार सुरु केला असुन, लाल कांदा अनुदान घोटाळ्यात सचिव डेबरे यांचे नाव आले होते. त्याच्यासह इतर दोषीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले होते. मात्र पोलिसांकडून गुन्हादाखल न करता केवळ तक्रार दाखल केली. सचिवाचे सह्याचं अधिकार काढण्यात आले होते मात्र याबाबत नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा सचिव डेबरे याना सह्याचे अधिकार बहाल केले होते.
दरम्यानच्या सचिव मात्र बाजार समिती कार्यालयात फिरकले देखील नाही. रजेवर जाण्यापूर्वी तसा अर्ज सभापती आणि संचालक मंडळाकडून मंजूर करून घेणे गरजेचे असताना डेबरे यांनी मात्र बाजार समितीत असलेल्या हंगामी कर्मचारी यांच्याकडे रजेचा अर्ज पंधरा दिवसापूर्वी दिला आहे. सचिवांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सभापती अतुल लोखंडे यांनी केली आहे.