कायदेतज्ज्ञ उज्वल निकम याना भाजपाची उमेदवारी ; पूनम महाजनांचा पत्ता कट

कायदेतज्ज्ञ उज्वल निकम याना भाजपाची उमेदवारी ; पूनम महाजनांचा पत्ता कट
MUMBAI LOKSABHA NEWS – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम याना तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने स्व. प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापले आहे.
भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी सामना होणार आहे. या मतदारसंघात प्रथमच प्राध्यापिके विरोधात एका वकिलाची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आणि उज्जवल निकम यांचा या मतदारसंघाशी संबंध नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेत्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाल्याने नाराज झाल्याचे समजतेय येत्या काळात त्या निकम यांचे काम करतात कि पक्ष आदेशाविरोधात भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
दरम्यान निकम यांच्या नावाच्या आधी आशिष शेलार यांच्यापासून ते अभिनेत्री माधुरी दिक्षीत, अनुराधा पौडवाल अशा अनेक सेलिब्रिटीजची नाव पडताळली गेली होती. पण निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांचा जीवन परिचय :
प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यांत सरकारचे वकील
तीन दशकांहून अधिक काळ वकिलीमध्ये
बी एससी व एल एल बी फर्स्टक्लासमध्ये पास
2016 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव
2011मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानद डॉक्टरेट
2009 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटीलच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्यसैनिक उंधाळकर पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्सकडून ‘स्टेट आयडॉल’पुरस्काराने गौरव
स्टार माझा वाहिनीकडून बेस्ट ऍडवोकेट पुरस्काराने गौरव
डीएनए दैनिकाकडून महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव
नागपूरकरांकडून दक्ष नागरिक म्हणून गौरव
महाराष्ट्र टाइम्सकडून टॉप मराठी अचिव्हर पुरस्काराने गौरव
औरंगाबामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्काराने गौरव
सरकारी वकील म्हणून लढलेले खटले :
1991 कल्याण रेल्वे बाँबस्फोट खटला
1993 मुंबई साखळी बाँबस्फोट खटला
1994 पुण्यातले राठी हत्याकांड
2003 गेट वे ऑफ इंडिया व झवेरी बाजार बाँबस्फोट खटला
2003 गुलशन कुमार खून प्रकरण
2004 नदीमच्या हस्तांतरणाचा लंडनमधला खटला
2006 खैरलांजी दलित हत्याकांडाचा खटला
2006 गँगस्टर अबु सालेम प्रकरण
2006 प्रमोद महाजन हत्या प्रकरण
2008 मुंबईवरचा दहशतवादी हल्ला
2010 कोल्हापुरातले साखळी बाल हत्याकांड
2010 शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
2016 डेव्हिड हेडली खटला