शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजना; असा घ्या लाभ

शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या या कल्याणकारी योजना
CENTRAL GOVERNMENT FARMER SCHEME – शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि कठीण काळात शेती करू शकतात. योजनांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे शासनाकडून पाठवले जातात. शेतकऱ्यांनी अधिकाधिक याचा लाभ घेतला पाहिजे.
पंतप्रधान पीक विमा योजना
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या पिकाचे कोणत्याही स्वरूपात नुकसान झाल्यावर या
पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीकांचे, नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत करत असते.
किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 पासून सुरु आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ४ महिन्यातू एकदा या स्वरूपात हि मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेकऱ्याला अर्ज करता येतो.
भारतातील कोणत्याही शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या या योजनांचा लाभ घेता येतो, त्यामुळे सर्वानी शासनाच्यता अधिकृत संकेत स्थळावर जावून पुढील प्रोसेस करावी.