१० वी, १२ वी परीक्षांचा निकाल मे मध्ये लागणार !

१० वी, १२ वी परीक्षांचा निकाल मे मध्ये लागणार
10th and 12th result news – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील महिन्यात लागण्याची शक्यता आहे. आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार या उत्सुकतेत असलेले विद्यार्थी आणि पालक याना दिलासा मिळणार आहे. येत्या 25 मे पर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होईल, अशी माहिती बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दहावी, बारावीचा निकाल मे आणि जून महिन्यात लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahasscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू झाली होती. बारावीसाठी एकूण 14 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर दहावी आणि बारावीचे मिळून एकूण 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली आहे.
दरम्यान जे विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचे समजतेय. तसेच बोर्डाच्या परीक्षा पध्दतीत बदल होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे परीक्षा घेतल्या जाऊ शकतात एक म्हणजे ओपन बूक परीक्षा पद्धती आणि दुसरी म्हणजे सेमिस्टर पॅटर्न होय.