या बँकांच्या नियमात उद्यापासून होणार नवे बदल

या बँकांच्या नियमात उद्यापासून होणार नवे बदल
BANK NEW RULE NEWS – भारतातील काही प्रमुख बँकांनी आपल्या नियमामध्ये मोठे बदल केले असून त्याची अंमलबजावणी उद्या १ मे २०२४ पासून होणार आहे. या बदललेल्या नियमांमुळे काही ठिकाणी सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे, त्यामुळे बँकेच्या ग्राहकांनी सर्व माहिती घेऊनच पुढील निर्णय घ्यावा.
येस बँक
येस बँकेच्या ग्राहकांना प्रो मॅक्स खाते असेल तर खात्यात कमीत कमी 50 हजार रुपये ठेवावे लागनार आहे. प्रो प्लस बचत खात्यात कमीत कमी 25 हजार रुपये ठेवावे लागतील. प्रो बचत खात्यात कमीत कमी 10 हजार रुपये ठेवावे लागतील. एलिमेंट डेबिट कार्डसाठी प्रतिवर्षी 299 रुपयांचे शुल्क द्यावे लागले. एंगेज कार्डसाठी 399, एक्सप्लोअर डेबिड टार्डसाठी 599, रुपे डेबिट कार्डसाठी (शेतकऱ्यांचे खाते) वर्षाला 149 रुपये द्यावे लागतील.
आयडीएफसी फस्ट बँक :
आयडीएफसी फस्ट बँकेच्या क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही बील देणं महागणार आहे. फोन बील, वीजबील, इंटरनेट बील, केबल सर्व्हिस, पाणीबील आदी बील तुम्ही क्रेडिट कार्डने देत असाल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. फस्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्ड, एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्ड यासाठी मात्र हा नियम लागू नसेल.
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेच्या नव्या नियमानुसार डेबिट कार्डसाठी शहरी ग्राहकांना प्रतिवर्ष 200 रुपये तर ग्रामीण भागातील ग्राहकांना प्रतिवर्षी 99 रुपये द्यावे लागणार आहेत. एक मे रोजीपासून पासबुकच्या सेवेसाठीही काही शुल्क द्यावे लागेल. चेब बुकचे पहिले 25 चेक हे निशुक्ल असतील. मात्र त्यानंतर प्रत्येक चेकसाठी चार रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. डिमांड ड्राफ्ट किंवा पीओ रद्द झाल्यास 100 रुपये तर आयएमपीएसच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार केल्यास 1,000 रुपये ट्रान्सफर केल्यावर प्रत्येक ट्रान्झिशनसाठी 2.50 रुपये द्यावे लागणार आहेत.
एचडीएफसी बँक :
एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या एफडी योजनेत गुंतवणुकीची तारीख वाढवली आहे. या योजनेत 10 मे 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेची सुरुवात मे 2020 मध्ये झाली होती. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दिले जाते.