नगरमधून २५ तर शिर्डीतून २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नगरमधून विखे विरुद्ध लंके तर शिर्डीत वाकचौरे, लोखंडे आणि रुपवते यांच्यात मुख्य लढत
नगरमधून विखे विरुद्ध लंके तर शिर्डीत वाकचौरे, लोखंडे आणि रुपवते यांच्यात मुख्य लढत
अहमदनगर ELECTION NEWS – जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. काल दि २९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुमारे १३ उमेदवारांनी माघार घेतली., तर ४५ उमेदवार आता रिंगणात आहेत. दरम्यान नगर लोकसभा मतदार संघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांच्यात तर शिर्डी मध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनाचे सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
एमआयएम, लंकेची माघार
अहमदनगर मतदारसंघातुन एमआयएमचे परवेज शेख, अपक्ष असलेले निलेश साहेबराव लंके यांनी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान शेख आणि लंके यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हे भाजपाची बी टीम असल्याचे चर्चिले गेल, मात्र याकडे भाजप तसेच विखे यांनी दुर्लक्ष केले. मात्र आता माघार घेतल्याने वातावरण शांत झालेले पाहायला मिळतेय.
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार 16 पेक्षा अधिक झाल्याने दोन बॅलेट युनिट मशीन प्रत्येक मतदान केंद्रात बसवल्या जातील. दोन्ही मतदारसंघांत एकूण 36 लाख 59 हजार 201 मतदार आहेत.
नगर मतदारसंघातून हे उमेदवार असणार निवडणूक रिंगणात
डॉ. सुजय विखे (भाजप), नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), उमाशंकर यादव (बहुजन समाज पार्टी), आरती हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), दिलीप खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भागवत गायकवाड (समता पार्टी), कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना), डॉ. कैलाश जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी),मदन सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), रावसाहेब काळे (बहुजन मुक्त्ती पार्टी), रवींद्र कोठारी (राष्ट्रीय जनमंच), गंगाधर कोळेकर (अपक्ष), नवशाद शेख (अपक्ष), प्रवीण दळवी (अपक्ष), सूर्यभान लांबे (अपक्ष), अनिल शेकटकर (अपक्ष), अॅड. महंमद जमीर शेख (अपक्ष), भाऊसाहेब वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजीराव डमाळे (सैनिक समाज पार्टी), अमोल पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र शिंदे (अपक्ष), मच्छिंद्र गावडे (अपक्ष), बिलाल गफुर शेख (अपक्ष), गोरख आळेकर (अपक्ष).



शिर्डी मतदारसंघातून हे उमेदवार असणार निवडणूक रिंगणात
भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उबाठा), सदाशिव लोखंडे (शिवसेना (शिंदे गट)), उत्कर्षा रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर कदम (अपक्ष), भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष), प्रशांत निकम (अपक्ष), चंद्रकांत दोंदे (अपक्ष), अभिजित पोटे (अपक्ष), भारत भोसले (समता पार्टी), नितीन पोळ (बहुजन भारत पार्टी), गोरक्ष बागुल (अपक्ष), अॅड. सिद्धार्थ बोधक (अपक्ष),संजय भालेराव (अपक्ष), रवींद्र स्वामी (अपक्ष), विजयकुमार खाजेकर (अपक्ष) रामचंद्र जाधव (बहुजन समाज पार्टी), अशोक आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतीश पवार (अपक्ष), नचिकेत खरात (अपक्ष), राजेंद्र वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी).