जीएसटीतून केंद्र सरकारची २ लाख कोटींची कमाई

जीएसटीतून केंद्र सरकारची २ लाख कोटींची कमाई
GST NEWS : सरकारच्या तिजेरीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातील जीएसटी महसूल आत्तापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 2.10 लाख कोटी रुपये झाला आहे. जीएसटी महसूल पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पार गेला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
GST महसुलाची वार्षिक वाढ ही अद्यापपर्यंत 12.4 टक्क्यांवर गेली आहे. जीएसटी महसूलात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. राज्याच्या जीएसटी महसूलात 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मार्च महिन्यात 37 हजार 671 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा13 टक्क्यांचा वाटा आहे.
दरम्यान गेल्यावर्षी मार्च महिन्यात 1.78 लाख कोटी जीएसटी वसुली झाली होती. त्यापेक्षा हा आकडा 17.81 टक्के अधिक आहे. सालाबादाप्रमाणए जीएसटीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्यात जीएसटीचे 37,671 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 13 टक्के अधिक आहे.
GST ची अशाप्रकारे झाली आहे कमाई
एकूण जीएसटी वसुलीत यंदा केंद्रीय जीएसटी कलेक्शन 43,846 कोटी रुपये, तर राज्याकडून 53,538 कोटी रुपयांची वसुली झाली. एकीकृत जीएसटी 99,623 कोटी रुपये राहिला. यामध्ये 37,826 कोटी रुपये आयात केलेल्या वस्तूंवर मिळाले. याशिवाय जीएसटी सेसच्या रुपात 13,260 कोटी रुपयांची वसुली झाली.